देशात ५०० रुपयांची नोट आणि आधार कार्ड बंद होणार का? पीआयबीने दिली महत्वाची अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । सध्या सोशल मीडियावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना आणि निर्णयांची माहिती व्हायरल होते. यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यपासून ते मोफत उपचारासह अनेक सुविधा देत आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पाहायला मिळत आहेत. यासोबतच अनेक यूट्यूब चॅनल फेक न्यूज दाखवत आहेत, याबद्दल केंद्र सरकारने सर्वांना सतर्क केले आहे. आता ५०० रुपयांची नोट आणि आधारकार्ड बंद होणार असल्याची माहिती व्हायरल झाल्याची माहिती व्हायरल झाली आहे. या संदर्भात पीआयबीने महत्वपूर्ण अपडेट दिली आहे.

पीआयबीने आपल्या ट्विटरवरुन एक ट्विट करत अपडेट दिली. ट्विटमध्ये सांगितले आहे की, सध्या शैक्षणिक दोस्त नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे जे खोट्या बातम्या पसरवत आहे. पीआयबीने तथ्य तपासले आहे आणि सांगितले आहे की अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला जात आहे, यामध्ये दावा केला जात आहे की, ५०० रुपयांची नोट आणि आधार कार्ड भारतात बंदी घालण्यात येईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पीआयबीने तथ्य तपासले आणि हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट असल्याचे घोषित केले.

ही पोस्ट बनावट असल्याचे पीआयबीने म्हटले आहे, यासोबतच असे फेक व्हिडीओ कोणाशीही शेअर करू नका, असे सरकारने म्हटले आहे.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे संदेश कोणाशीही शेअर करू नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करू नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *