Tomato Rates Update : टोमॅटोची लाली उतरली ! भाव आले निम्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । नेपाळमधून टोमॅटो आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव 50 टक्के कोसळले आहेत. खेड बाजार समितीच्या चाकणमधील घाऊक तरकारी बाजारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या 20 किलोच्या क्रेटला सरासरी 2300 ते 2500 रुपये भाव मिळाला होता. शनिवारी (दि. 12) हा भाव निम्म्याने घसरला. येत्या काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अचानक भावात मोठी घसरण सुरू झाल्याने ग्राहक खुशीत असला, तरी टोमॅटो उत्पादक हादरले आहेत.

चाकणमधील अडत्यांनी सांगितले की, मागील आठवड्यात घाऊक बाजारात कांद्याचे दर 100 ते 120 रुपये किलो होते. आता हेच दर 50 ते 60 रुपये किलोपर्यंत खाली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या मागणीत अचानक वाढ झाली. खेड बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक 2 ते 4 हजार क्रेट्सपर्यंत येत असल्याने आणि प्रतिक्रेट 2300 ते 2500 रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक आनंदात होते.

घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव अधिक प्रमाणात वाढल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच राज्याच्या अन्य भागांतून बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. या दुहेरी घडामोडींमुळे शनिवारी टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले असल्याचे अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष कुमार गोरे यांच्यासह अडते आणि व्यापार्‍यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *