Gadar 2 Vs Jailer : अक्षयच्या OMG 2 चा विषय संपला, आता थेट फाईट तारासिंग Vs थलायवा ! कोण जिंकणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । सुपरस्टार रजनीचा जेलर प्रदर्शित झाला आहे. साऊथमध्ये देवासमान ज्याच्या अभिनयावर प्रेम करतात त्या रजनीकांतच्या चित्रपटांची गोष्टच वेगळी आहे. साऊथचा सुपरस्टार म्हणून ज्याच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या रजनीकांतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे नेहमीच निखळ मनोरंजन केले आहे. चार दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं आपलं महत्वपूर्ण योगदान फिल्म इंडस्ट्रीला दिले आहे.

बॉलीवूडमध्ये दोन महत्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात एक आहे २२ वर्षांनी प्रदर्शित झालेला सनीचा गदर आणि दुसरा अकरा वर्षांनी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ओएमजी २. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक बऱ्याच कालावधीपासून आतूरतेनं वाट पाहत होते. त्यात सनीच्या गदर सोबत प्रेक्षकांचे जरा भावनिक नाते होते. त्यातील तारा सिंग आणि सकीनाच्या प्रेमकथेला दोन देशांमधील तणावाची पार्श्वभूमी होती.

सनीचा गदर प्रदर्शित झाला आणि देशांमध्ये एका वेगळ्याच उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान असा संघर्ष या चित्रपटामध्ये मोठ्या खूबीनं उभा करण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून देशभक्तीचं वातावरण निर्माण करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. त्याचे बरेचसे श्रेय हे सनीच्या अभिनयाला द्यावे लागेल. या तुलनेत अक्षयचा ओएमजी २ हा एका वेगळ्या विषयावर भाष्य करताना दिसतो.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाची खरोखरच गरज आहे का असा प्रश्न त्यानं त्या चित्रपटातून उभा केला आहे. त्यालाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. रजनीच्या जेलरमध्ये त्याच्या अॅक्शननं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या तीनही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा आहे. त्यात गदरनं ओएमजीला मोठी टक्कर देत मागे ढकलले आहे. गदरनं आतापर्यत ८५ कोटींची कमाई केली आहे.

जेलरनं मात्र तीनच दिवसांत शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार बोलायचे झाल्यास यापुढील काळात जोरदार टक्कर ही रजनीचा जेलर आणि सनीचा गदर यांच्यात दिसून येणार आहे. या तुलनेत ओएमजीनं आतापर्यत १५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनमधून ओएमजी २ हा बाहेर पडल्याचे दिसून येत असून सोशल मीडियावर त्याविषयी चर्चा सुरु केली आहे.

रजनी आणि गदर यांच्यात तुलना होऊ लागली आहे. सनीच्या गदरचं कौतूक होताना प्रेक्षकांना रजनीच्या सत्तरीतल्या जबरदस्त परफॉर्मन्सनं थक्क केले आहे. नेल्सन दिलीपकुमारच्या जेलरनं आतापर्यत १०९.१० कोटींची कमाई केली आहे. तमिळ चित्रपटविश्वामध्ये थलायवानं एका वेगळ्याच विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

याविषयीची अधिक माहिती ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटर अकाउंटवरुन शेयर केली आहे. केवळ भारतच नाहीतर जगभरातून देखील थलायवानं कमाल केली आहे. त्यात अमेरिकेमध्ये जेलरनं ९०० डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. यापूर्वी थलापती विजयच्या मास्टरला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ते रेकॉर्ड आता जेलरनं मोडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *