Smartphone Performance : या टिप्स वापरा, अगदी कमी रॅमचा फोनही होईल वेगवान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । Mobile Tips : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अगदी महत्त्वाचा भाग झाला आहे. केवळ एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठीच नाही, तर अन्य कित्येक कामांसाठी आज स्मार्टफोनचा वापर केला जातो. कित्येक जणांचं ऑफिसचं कामही स्मार्टफोनवरच होतं. यामुळे हा स्मार्टफोन खरोखरच ‘स्मार्ट’ असणं गरजेचं आहे.

आपला फोन जर वारंवार हँग होत असेल, किंवा सुरू असलेले अ‍ॅप्स वारंवार क्रॅश होत असतील; तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे. कमी रॅम असणाऱ्या फोनमध्ये तर ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे, स्मार्टफोन स्लो किंवा हँग होऊ नये यासाठी आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे.

असा करा बूस्ट
स्मार्टफोनचा परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी तुम्ही काही साध्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. या गोष्टींमुळे स्मार्टफोन हँग होण्याचं प्रमाण कमी होतं, आणि कामाच्या वेळी अ‍ॅप्स क्रॅशही होत नाहीत. (Mobile Ram boosting tips)

डेटा सेव्हर मोड
तुम्ही इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात करत असाल, तर स्मार्टफोनच्या ब्राउजरवर डेटा सेव्हर मोड सुरू करणं गरजेचं आहे. कित्येक अ‍ॅप्समध्ये देखील याप्रकारची सेटिंग उपलब्ध असते. यामुळे वेबपेजेस कंप्रेस होतात आणि फोनवर जास्त लोड येत नाही. यामुळे फोन अधिक वेगाने काम करतो.

कॅशेस करा क्लिअर
स्मार्टफोनमध्ये ठराविक कालावधीनंतर कित्येक जंक फाईल्स, कॅशेस जमा होत राहतात. या फाईल्स भरपूर जागा व्यापून तुमच्या फोनला स्लो करण्याचं काम करतात. त्यामुळे वेळोवेळी हे Caches क्लिअर करणं गरजेचं आहे.

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स
एखादं अ‍ॅप उघडल्यानंतर तुम्ही जर थेट होम स्क्रीनवर गेलात, तर ते अ‍ॅप बंद होत नाही. बॅकग्राउंडमध्ये ते अ‍ॅप सुरूच असतं. असंच तुम्ही एकापाठोपाठ एक असे भरपूर अ‍ॅप्स उघडले, तर तुमच्या फोनवर अधिक लोड येतो. त्यामुळे काम झाल्यानंतर ते अ‍ॅप पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे.

अनावश्यक अ‍ॅप्स
आजकाल नवीन स्मार्टफोनसोबत कित्येक अ‍ॅप्स प्री-इन्स्टॉल केलेले मिळतात. या अ‍ॅप्सना साधारणपणे ब्लोटवेअर म्हटलं जातं. यातील बरेच अ‍ॅप्स हे आपल्या काहीच कामाचे नसतात. त्यामुळे विनाकारण जागा व्यापणारे हे अ‍ॅप्स काढल्यामुळे फोनला अतिरिक्त रॅम मिळू शकते. यामुळे तुमचा फोन अधिक वेगाने काम करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *