IND vs WI 5th T20: आज टीम इंडिया मालिका खिशात घालणार की विंडीज कमबॅक करणार? अशी असेल प्लेईंग ११

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. सध्या मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. पहिले दोन सामने विंडीजने जिंकले होते. त्याचवेळी भारताने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. आता शेवटचा सामना निर्णायक असेल. सलग दोन विजयानंतर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता कमी असली तरी वेस्ट इंडिजच्या संघात अनेक बदल होऊ शकतात.

भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात नक्कीच बदल होऊ शकतो. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता, पण चौथ्या टी२०मध्ये तिलक वर्माला बढती देत तिसऱ्या क्रमांकवर पाठवण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाचव्या सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये काय बदल होतात आणि सूर्या कुठल्या जागी फलंदाजीसाठी येऊ शकतो? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. मात्र, भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात आवेश खान आणि उमरान मलिक यांना संधी देऊ शकला असता, परंतु ही मालिका निर्णायक आहे आणि या विजयासह हार्दिकला त्याच्या नेतृत्वाखाली एकही टी२० मालिका न गमावण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे. दडपणाखाली भारतीय संघाने दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून मालिका जिंकून हार्दिकला संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावायचा आहे.

वेस्ट इंडिजमध्ये बदलाची अधिक शक्यता
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याने या बदलाबाबत आधीच सांगितले होते. जरी याच कारणामुळे वेस्ट इंडिज संघात बदल करण्यात येत असले तरी सलग दोन पराभवानंतर कॅरेबियन संघावर आता मालिका गमावण्याचे दडपण असणार आहे. या सामन्यातही पॉवेल आपल्या संघात बदल करू शकतो. ओडियम स्मिथच्या जागी अल्झारी जोसेफचा संघात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

दोन्ही संघांचे संभाव्य खेळ-११
वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, ओबेद मॅककॉय.

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *