महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – दि. २२ :- कमाॅडिटी बाजारात सोमवारी सकाळी सोन्याच्या किंमतीत ०.७ टक्क्याची वाढ झाली. सोन्याचा भाव ४८२८९ रुपयांवर गेला. चांदीचा भाव १.२ टक्क्यांनी वाढून ४९१९० रुपये झाला आहे. सोने आणि चांदीतील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवाड्यात कमाॅडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ दिसून आली होती. शुक्रवारी सोने ६०० रुपयांनी महागले होते. या तेजीने सोन्याचा भाव ४८००० रुपयांवर गेलो आहे. चांदीच्या किंमतीत १.५ टक्क्याची वाढ झाली होती. चांदीचा भाव किलोला ४८५९८ रुपये झाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने या मौल्यवान धातूंची मागणी आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. करोनाने आतापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान केले आहे. भांडवली बाजारातील गुंतवणूकदार पोळून निघालेत. त्यामुळे सुरक्षित आणि कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाॅंड आदी योजनांना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.