जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा ; ‘कोरोना’ ही शेवटची महामारी नव्हे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – दि. २२ :- कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. कोरोनावर पुढील वर्षांत खात्रीलायक अशी लस सापडेल. पण कोरोना ही काही शेवटची महामारी नव्हे. अशा प्रकारच्या महामारी येतच राहतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

कोरोनाचा व्हायरस जगभरात पसरला आहे. मात्र, त्याच्याकडे एक आव्हान म्हणून न पाहता त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे. अशा देशांनी कोरोनाकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पाहावे आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्यावा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाला रोखण्यात काही अंशी यश आले आहे. मात्र, त्याचे यश प्रत्येक देशाने लॉकडाऊन काळात केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनावर अवलंबून आहे, असे स्वामिनाथन म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *