महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमण कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.
जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलं होते. त्यामुळे दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात लवकरच पाऊस कमबॅक करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. तर हवामान खात्याने लवरकरच राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
पालघर, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
15 ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत असून, पुढेही हे वातावरण कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचं चित्र आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.