Satara-Pune highway : पुण्याला जाणारी वाहतूक खंबाटकी घाटातून वळवली; बोगद्यातील अँगल तुटला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । सातारा -पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्यामधील लाईटचा असणारा अँगल तुटून रस्त्यावर चालत असलेल्या ट्रकमध्ये घुसले. यावेळे ट्रकचे ही नुकसान झाले असुन, अचानक अँगल खाली आल्याने चालकही किरकोळ जखमी झाले आहे .

पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करून ही वहातुक सकाळी सात वाजल्यापासुन वाहतूक खंबाटकी घाटाने पुर्वीचा मार्गाने पुणे बाजुकडे वळवली आहे .यासाठी भुईंज महामार्ग पालीस उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस वेळे ता. वाई येथे वहातुक वळविण्यासाठी पहारा देत आहे. तर महामार्ग पोलीस अविनाश डेरे सह इतर पोलीस बोगदा येथे कार्यरत आहे .

यापूर्वीही बोगद्यातील अँगल कारवर एस.टी.वर ट्रकवर पडलेले आहेत. पैकी काही अँगल यापूर्वी काढलेले आहेत. सदरचे अँगल 23 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले आहेत. सदरचे अँगलचे परीक्षण झालेले नाही. सध्या ते बरेच अँगल कमकुवत झालेले आहेत.

त्याचे परीक्षण होऊन बरेच अँगल काढणे आवश्यक आहे. अन्यथा यापुढेही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.अशीमागणी वाहनचालका कडुन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *