“कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…” ; पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट घेतली आहे. वडिलकीच्या नात्याने पुतण्याची भेट घेतली, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. मात्र, या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवारही सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना येत्या १७ ऑगस्ट रोजी शरद पवार बीडमध्ये जाहीरसभा घेणार आहेत. या सभेतून शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडतील, असं बोललं जात आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांची ही सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी असू शकते, असंही बोललं जात आहे.

यावरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या बीडमधील सभेबाबत विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, “एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.” बीडमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री मुंडे यांनी हे विधान केलं आहे.

दुसरीकडे, शरद पवारांच्या बीड येथील सभेची अधिक माहिती देताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “येत्या १७ तारखेला शरद पवार बीडला जाणार आहेत. त्याठिकाणी एक जाहीरसभा होणार आहे. ही सभा खूप मोठी असेल. बीडनंतर पुण्यातही सभा होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगला संवाद आहे. पण काँग्रेसच्या मनात काही शंका असू शकते. बीड येथील सभेतून शरद पवार अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *