Gadar 2 Box Office Day 5: गदर 2 ने सगळे रेकॉर्ड मोडत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अनीषा पटेल यांच्या गदर 2 ने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा जादू दाखवली आहे. तब्बल 22 वर्षांपूर्वी आलेल्या गदर इतकंच प्रेक्षकांत प्रेम या चित्रपटाला मिळत आहे.

गदर 2 ने रिलीजच्या अवघ्या 5 दिवसात बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. त्यात कालचा स्वातंत्र्यदिन या चित्रपटासाठी खुपच खास ठरला. यादिवशी गदर 2 ने 200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे.

गदर 2 ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी रेकॉर्डब्रेक कमाई करत पुन्हा एकदा रेकॉर्ड केला आहे. भारत पाकिस्तानातील प्रेमकहानीवर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी झाली होती.

गदर 2 ने रिलीजच्या पाचव्या दिवशी सगळ्या जास्त कोटींचा गल्ला जमावला आहे. सनी देओलच्या गदर 2 ने रिलिजच्या 5 व्या दिवशी 55.5 कोटींची कमाई केली. याच आकड्यावरुन आता गदर 2 च्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाने जगभरात आत्तापर्यंत 230 कोटींचा गल्ला जमावला आहे.

या आकडेवारी नुसार सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर गदर 2 ने प्रभासच्या बाहुबली 2, सलमान खानचा सुलतान आणि हृतिक रोशनच्या वारला देखील मागे टाकले आहे.

बॉलीवूडमधील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गदर 2 आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाची कमाई आणि चाहत्यांचे प्रेम पाहून सनी देओल आणि निर्माते खूश आहेत.

अनिल शर्मा यांनी गदर 2 चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. उत्कर्षने गदर २ मध्ये सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली आहे. सिमरत कौरने देखील चित्रपटात महत्वाची भुमिका साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *