नवाब मलिक नक्की कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार ; शरद पवारांचा नवाब मलिक यांना फोन, प्रकृतीची विचारपूस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षानंतर तुरुंगातून सुटले आणि अवघ्या महाराष्ट्र प्रश्न पडला की ते शरद पवार (Sharad Pawar) गटाला पाठिंबा देणार की, अजित पवार गटात सामिल होणार. परंतु नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय भूमिकेबाबत नवाब मलिक यांचा तूर्तास तरी कोणताही निर्णय नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिकांची फोनवरून तब्येतीची शरद पवार यांनी चौकशी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून नवाब मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे.

नवाब मलिक जेव्हा कोठडीत गेले तेव्हा राष्ट्रवादी एकच होती. पण आता कोठडीतून बाहेर पडताना त्या राष्ट्रवादीची दोन गट झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन नक्की कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या दोन्ही गटाकडून संपर्क साधण्यात येत असला तरी नवाब मलीक यांच्याकडून मात्र आरोग्य सुधारण्याला महत्व दिले आहे. नवाब मलिक यांनी सध्या कोणत्याही गटाला पाठिंबा जाहीर केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या वैद्यकीय जामिनानंतर मलिकांची ईडीच्या अटकेतून सोमवारी सुटका झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेत्यांनी मलिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

नवाब मलिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मलिकांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. यावेळी राजकीय विषयावर चर्चा केली नसल्याचं पटेलांनी सांगितलं. एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटीगाठी सुरू असताना, दुसरीकडे राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी नवाब मलिक कोणताही निर्णय घेणार नसून आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहितीआहे. नवाब मलिक किडनीविकारानं ग्रस्त असून त्यांची एक किडनी निकामी झाली आहे.

नवाब मलिकांना मला राजकारणात अडचणीत आणायचे नाही, त्यामुळे सध्यातरी त्यांना तसदी देणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी सत्ताधारी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ दिली तर नवाब मलिकांविरोधात मोर्चा उघडणाऱ्या भाजपला ते चालेल का? नवाब मलिक सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. मेडिकल ग्राऊंड्सवरच त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन पुढचे दोन महिने कोणत्या कॅम्पमध्ये जातात. त्यावर मलिकांचं भवितव्य ठरेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *