![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । अॅपल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयफोननंतर अॅपलच्या ‘एअरपॉड्स’चं उत्पादन देखील आता भारतात होणार आहे. लवकरच फॉक्सकॉनच्या हैदराबादमधील फॅक्टरीत Apple AirPodsचं उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.
फॉक्सकॉन कंपनी अॅपलच्या आयफोनसह अन्य कित्येक उत्पादनांची निर्मिती करते. हैदराबादमधील प्लांटसाठी फॉक्सकॉनने यापूर्वीच 400 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी मंजूरी दिली आहे. 2024 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत याठिकाणी उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या हवाल्याने आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
एअरपॉड्सचं खास फीचर
अॅपलचे एअरपॉड्स टीडब्ल्यूएस हे भारतासह जगभरात प्रसिद्ध आहेत. यामध्ये उत्कृष्ट नॉईज कॅन्सलेशन फीचर आणि उत्तम साऊंड क्वालिटी देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या कानाच्या आकारानुसार आवाज ट्यून करण्याचं विशेष फीचरही यात देण्यात आलं आहे.
जगभरात प्रसिद्धी
ग्लोबल TWS मार्केटमध्ये अॅपलच्या एअरपॉड्सचा शेअर 36 टक्के आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंगचे TWS हेडफोन (7.5 टक्के) आहेत. त्यानंतर श्याओमी (4.4 टक्के) आणि बोट (4 टक्के) या कंपन्यांचा क्रमांक आहे