महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – पेट्रोल- डिझेलच्या दरात सलग १७ व्या दिवशीही वाढ होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल दरात २० पैशांची तर डिझेल दरात ५५ पैशांची वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीतील पेट्रोलचे लिटरचा दर प्रतिलिटर ७९. ७६ रुपयांवर तर डिझेलचा दर ७९. ४० रुपयांवर गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठात गेल्या १७ दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असून बाजारात मात्र पेट्रोल- डिझेल दर सतत वाढतच आहेत.सोमवारी (दि.२२) रोजी दिल्लीतील पेट्रोलचे लिटरचे दर ७९.५६ रुपये तर डिझेलचे लीटरचे दर ७८.८५ रुपयांवर गेले होते.