राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून उदगीर शहरातील कंटेनमेंट क्षेत्राची पाहणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – उदगीर- शहरातील हनुमाननगर, नुर पटेल कॉलनी, विकासनगर येथे कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कंटेनमेंट क्षेत्राची पाहणी केली तसेच आरोग्य, महसुल, नगरपालिका विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती यावेळी घेतली.यावेळी कंटेनमेंट झोन मधील नागरीकांना लागणारे जिवन आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या. तसेच आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रुग्णाकरींता अ‍ॅम्ब्युलन्स ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

तसेच नगरपालिका, महसुल, आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही यावेळी घेतली.
तसेच उदगीर तहसील कार्यालयात, महसुल, पोलीस, आरोग्य, नगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेऊन यापुढे प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार, ता. अध्यक्ष शिवाजीराव मुळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, न. प. मुख्याधिकारी भरत राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवार, डॉ. देशपांडे, शहर पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, नायब तहसीलदार खरात, शहर अध्यक्ष समीर शेख, शहर अध्यक्ष मंजुरखाॅं पठाण, ज्ञानेश्वर पाटील यांच्या सह अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *