महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे पोटाच्या समस्या बहुतेकांमध्ये बघायला मिळतात. यात अॅसिडिटी आणि गॅस होणे या तर फारच सामान्य समस्या झाल्या आहेत. यामुळे पोटात दुखणे ही समस्या होतेच पण चार चौघात अवघडलेपणही येते.
पण या समस्येचे निवारण करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक उपाय म्हणजे सकाळी उपाशी पोटी ही फळे खाणे. जाणून घेऊया सविस्तर.
ही फळे खावीत
केळी
केळीमध्ये कॅल्शियम, फायबर इतर पोषक घटक असतात. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅसची समस्या कमी होऊ शकते.
कलिंगड
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. हे खाल्ल्याने गॅसची समस्या कमी होते. कारण यात असलेले फायबर अन्न पचवण्यास मदत करते.
किवी
किवीमध्ये व्हिटॅमीन सी जास्त प्रमाणात असते. आहारात याचा समावेश केल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो. गॅसच्या समस्येवर हे फळ खूप उपयुक्त आहे.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी इत्यादी पोटासाठी खूप फायदेशीर आहे. गॅसची समस्या कमी करण्यासाठीही हे फळ उपयुक्त आहे.
अंजीर
अंजीरमुळे गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन बी आदी आरोग्यासाठी खूप फायदेशीर घटक आहेत.
सफरचंद
सफरचंदात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात. हे फळ पोटासाठी फार उपयुक्त असते.
नाशपती
पोटासाठी हे फळ फार उपयुक्त आहे. त्यात बद्धकोष्ठता, गॅसची समस्येवर हे गुणकारी ठरते. निरोगी राहण्यासाठी आहारात याचा नक्की समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.