महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । सातारा – पुणे महामार्गावरील गुरुवारी रात्री दीड वाजता खंबाटकी बोगद्यात पुन्हा लोखंडी अँगल स्विफ्ट कार ( नंबर MH-01 -BG-7760 ) चे बोनेटवर आदळला. सुदैवाने जखमी कोणी नाही मात्र गाडी चे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी एकच लेनने वहातुक सुरु ठेवली होती .
ही घटना तीन दिवसात सलग दोनवेळा झाल्याने महामार्ग प्राधिकरणाला ‘ उघडा डोळे, बघा नीट’ म्हणण्याची वेळ आली आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
यावेळी बोगद्यातील एकच लेन सुरु ठेवण्यात आली . दरम्यान हा लोखंडी अँगल काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( N.H.I. )कडून क्रेन उपलब्ध झाली नाही. यावेळी महामार्ग पोलीस भुईंज ,जोशी विहीर यांनी सदरचा अँगल महामार्ग पोलीस यांनी प्रवाशांच्या मदतीने हाताने उचलून बाजूला केला.
यानंतर अडीच तासाने पुण्याकडे जाणारी वाहतूक दुसरी लेन ही सुरु झाली. यावेळी महामार्ग पोलीस पथक भुईजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे,पोलीस उपनिरीक विजय जाधव, पोलीसकृष्णकांत निंबाळकर, पोलीस हवालदार संतोष लेऺभे यांनी शर्थीने खिंड लढवत हा भलामोठा अँगल प्रवाशांच्या मदतीने बाजुला केल्यानेच वहातुक सुरळीत झाली.अन्यथा आज ही खंबाटकीत पुन्हा वहातुक कोंडी झाली असती.मात्र लोखंडी अँगल तत्काळ काढणे गरजेचे आहे .
900 मीटरचा बोगदयात प्रत्येक १० फुट वर हे अँगल आहे. हे लोखंडी अँगल सन २००० ला बसवले आहे. यास २२-२३ वर्ष झाल्याने हे गंजुन खाली पडत आहे. असे जवळपास ५० असे भलेमोठे लोखंडी अँगल अद्यापही आहेत .अचानक लोखंडी भलामोठा अँगल महामार्गावरील चालु गाडीवर पडल्यास जीवघेणा ठरू शकतो. याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजचे आहे .