महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ ऑगस्ट । भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.
या आठवड्यात सुट्यांमुळे एक दिवस भाव जाहीर झाला नाही. तर सोन्याला या आठवड्यात खासा कामगिरी करता आली नाही. सोन्यात पुन्हा पडझड झाली. 550 रुपयांची घसरण झाली. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.17 ऑगस्ट रोजी किंमती 350 रुपयांनी घसरल्या. या महिन्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली होती. 22 कॅरेट सोने 54,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,170 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
चांदीने केली चढाई
ऑगस्ट महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला होता. भाव 200 रुपयांनी वाढले होते. तर 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,471 रुपये, 23 कॅरेट 58,237 रुपये, 22 कॅरेट सोने 53,559 रुपये, 18 कॅरेट 43,853 रुपये, 14 कॅरेट सोने 34,206 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,447रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.