एक्सप्रेस वे आणि हायवेमध्ये नेमका काय फरक आहे ? जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । आधुनिक जगात प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. यात वाहतुकीच्या सुलभतेमध्ये रस्ते महत्वाची भूमिका बजावतात. पूर्वी देशात रस्त्यांच्या इतक्या मोठ्या सुविधा नव्हत्या. पण आता रस्ता हा शब्द मनात येताच आणखी दोन शब्द डोळ्यासमोर येतात ते म्हणजे हायवे आणि एक्सप्रेसवे. या दोन प्रकारच्या रस्त्यांमुळे चालकांना अगदी कमी वेळात दूरचे अंतर कापता येतेय. तुम्ही सर्वांनीच हायवे आणि एक्सप्रेसवेबद्दल ऐकले असेल किंवा बहुतेकांनी त्यावरून प्रवास केला असेल. पण बहुतेकांना हायवे आणि एक्स्प्रेस वेमधील फरक माहित नाही. त्यामुळे या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे. यावरुन प्रवास करताना गाड्यांसाठी वेगमर्यादा किती असते आणि किती टोल भरवा लागतो, जाणून घ्या…

हायवे आणि एक्सप्रेसवेमध्ये काय आहे फरक?
हायवे आणि एक्सप्रेसवे अशी दोन वेगळी नावं आहेत, ज्याच्यामुळे अनेक मैलांचा प्रवास काही तासांमध्ये पूर्ण करता येतोय. हायवे आणि एक्सप्रेस हायवे हे दोन्ही रस्ते एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. देशातील अनेक क्सप्रेस वेवर काम सुरू आहे. एक्सप्रेस वेवरील वाहने हायवेच्या तुलनेत खूप वेगाने जातात. यातील एक्सप्रेस वे अधिक उंचीवर बांधले जातात. हायवेवर २ ते ४ लेनचा रुंद रस्ता असतो, तर एक्सप्रेसवेवर ६ ते ८ लेन आहेत. एक्सप्रेस भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांसाठी बनवले आहेत. पण प्रत्येक एक्स्प्रेस वेसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्यासाठी रॅम्प बनवले आहेत.

टोल आणि वेगमर्यादा
एक्स्प्रेस वेवरील एक्स्प्रेस सुविधेसाठी लोकांना हायवेच्या तुलनेत जास्त टोल टॅक्स भरावा लागतो. अहवालानुसार, सध्या देशातील एक्सप्रेस वेंची एकूण लांबी सुमारे ४००० किमी आहे. जे १२० किमी/ताशी कमाल वेगासाठी डिझाइन केलेले आहेत, तर हायवेवर कमाल वेग ८० ते १०० किमी/ताशी आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय महामार्ग NH44 ला देशातील सर्वात लांब महामार्ग म्हटले जाते, ज्याची एकूण लांबी ३७४५ किलोमीटर आहे. हा महामार्ग श्रीनगरमार्गे कन्याकुमारीकडे जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *