केंद्राविरोधात आक्रोश:निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के वाढवताच रविवारी संतप्त शेतकऱ्यांचा आक्रोश नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलनांतून व्यक्त झाला. काही ठिकाणी सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली, तर कुठे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनने रविवारी घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीमध्ये रविवारी (दि.२०) कांदा भावात एक हजार रुपयांपर्यंत घट झाली. शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून दीड तास रास्ता रोको केला. येथे शनिवारी प्रतिक्विंटल २२०० ते २५०० भाव होता तो रविवारी १६०० रुपये झाला.

शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार

निर्यात शुल्काचा चुकीचा निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. दरावर विशेष काहीही परिणाम होणार नाही – संदीप लुणावत, कांदा निर्यातदारलोकप्रतिनिधींना फिरु देणार नाहीदोन दिवसात केंद्राने निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेतला नाही तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरु देणार नाही – भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

परदेशात कांदा दरात वाढ : केंद्राने निर्यातशुल्क लावताच श्रीलंकेत १४० रुपये किलोचा कांदा १७० रुपये तर बांगलादेशमध्ये ४० रुपये किलोचा भाव ६० ते ७० रुपये झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *