निगडी सेक्टर २२ येथील अंध व्यक्तींना हॉकर्स उपलब्ध करून द्यावा

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची ना. बच्चू कडू यांच्याकडे मागणी

पिंपरीः

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील सेक्टर २२ या ठिकाणी सुमारे १२० ते १३० अंध व्यक्ती गेल्या २५-३० वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेक्टर २२ या ठिकाणी राहत असून ह सर्व अंध असून उदर्निवाह करण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय तसेच नोकरी करीत आहेत. त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातुन निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूला खालील पार्किंगमध्ये तसेच भक्ति-शक्ति उड्डाणपूला खालील पार्किंगमध्ये अंध व्यक्तींना हॉकर्स झोन पिंपरी चिंचवड महानगरपलिका प्रशासन यांच्याकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, सेक्टर २२ येथील अंध व्यक्तींच्या घराची मालमत्ता कर पाणीपट्टी माफ करण्यात यावी. त्यांना महानगरपालिकेच्या योजनांमधून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असून, त्यांना जगण्यासाठी महानगरपालिकेने हातभार लावावा.

सेक्टर २२ येथील अंध व्यक्तींना लवकरात लवकर हॉकर्स झोन धोरण राबवून रोजगाराची कधी देण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या माध्यमातून अंध व्यक्तींना काम स्वरूपी पेन्शन लागू करण्यात यावी, पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात विनामूल्य औषध उपचार करण्यात यावे. एक रुपायाही रक्कम न स्वीकारता राज्य सरकारकडून आरोग्य सेवा देण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *