महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहतायंत त्यांच्याविषयी आपण कडक भूमिका घेतली पाहिजे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या भूमिकेलाही अप्रत्यक्ष पाठिंबाच दिला. देशाच्या सव्वाशे कोटी जनतेनं ठरवलं चीनची वस्तू वापरायची नाही, तर त्या देशाला चांगला धडा शिकवता येईल, असंही अजित पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. भारत-चीन सीमा वादावरून तणाव निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राने चीनबरोबरच्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. याविषयी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ‘चीनला धडा शिकवणं शक्य आहे. भारतीय जनतेने चीनच्या वस्तू न घेऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे.’
रामदेव बाबांनी कोरोनावर आणलं पहिलं औषध, त्यावर काय म्हणाले अजित पवार
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच घ्यावं.”
“जुलै आणि ऑगस्टचा काळ अधिक कठीण आहे. लोकांनी जर त्यांच्यावर घालून दिलेली बंधनं नीट पाळली नाहीत तर त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते. आपण टेस्टिंग वाढवलं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलध्ये मनपा, राज्य सरकार, बॅंकांच्या कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी आहे, पण ही मागणी वाढत आहे. योग्यवेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल”, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.
