( औरंगाबाद ) संभाजीनगर ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव ; प्रशासनासमोर आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये सुरू असलेली असलेली करोना रुग्णवाढ अद्यापही थांबलेली नाही. आजही औरंगाबादमध्ये १२५ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे येथील करोना रुग्णांची संख्या ३ हजार ९३१वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे संभाजीनगरच्या ग्रामीण भागातही करोनाने शिरकाव केला असून या ठिकाणी ३८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी आणखी १२५ करोनाबाधित आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या३९६१ झाली आहे, तर आतापर्यंत २०६ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये शहर परिसरातील ८७, तर ग्रामीण भागातील ३८ बाधितांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत २१३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व सध्या १६१९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज शहर परिसरात सापडलेल्या ८७ बाधितांमध्ये कुतुबपुरा येथील १, नागसेन नगर १, बंजारा कॉलनी १, सराफा रोड २, व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क १, पडेगाव १, संभाजी कॉलनी, एन-सहा १, विद्या रेसिडेन्सी १, जुना बाजार, नारायण नगर १, पुंडलिक नगर २, पद्मपुरा १, ईटखेडा १, विष्णू नगर १, सादात नगर १, उल्कानगरी १, संत तुकोबा नगर, एन-दोन, सिडको १, न्यू हनुमान नगर १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, जयभीम नगर, टाऊन हॉल १, हर्ष नगर ७, संजय नगर, बायजीपुरा ४, राज नगर १, हर्सूल जेल ४, सिद्धेश्वर नगर, जाधववाडी २, वसंत नगर, जाधववाडी ३, नागेश्वरवाडी १, एकता नगर, चेतना नगर १, जाधववाडी १, क्रांती नगर १, म्हसोबा नगर १, पोलिस कॉलनी १, एन-नऊ हडको १, एन-११ येथे १, एन-१३ येथे १, राज हाईट १, विनायक नगर, देवळाई २, विशाल नगर १, गरम पाणी ३, बुढीलेन ३, गारखेडा ३, हरिचरण नगर, गारखेडा १, शिवाजीनगर १, रोजा बाग २, दिल्ली गेट ६, बेगमपुरा १, नेहरू नगर १, जामा मस्जिद परिसर १०, मयूर पार्क १ भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ३८ बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये साई नगर, बजाज नगर येथील १, बजाज नगर, वाळूज १, हिवरा २, पळशी १, मांडकी ४, कन्नड १, पांढरी पिंपळगाव १, दर्गा रोड, दारुसलाम पैठण ६, पडेगाव, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ५, गंगापूर २, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, जयसिंग नगर, गंगापूर २, हाफिज नगर, सिल्लोड २, बिलाल नगर, सिल्लोड ५, इंदिरा नगर, वैजापूर १, पोलिस कॉलनी, वैजापूर १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांमध्ये ५० महिला व ७५ पुरुष आहेत. शहरांप्रमाणेच आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link