विवरण पत्रके वेळेवर दाखल करण्याचे अनेक फायदे होत असतात, म्हणून आयकर विवरण…आर्थिक वर्ष 2018-19 चे 30 जुन व आर्थिक वर्ष 2019-20 चे 30 नोव्हेंबर ’20 पर्यंत दाखल करावेत ; जेष्ठ कर सल्लागार पी. के. महाजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – कोणतेही विवरण पत्रके वेळेवर दाखल करण्याचे अनेक फायदे होत असतात त्या मुळे उद्योजक, व्यावसायीक व पगारदार वर्गा ने आर्थीक वर्ष 2018-19 व 2019-20 चे आयकर विवरण पत्रक वेळेवर दाखल करावेत :आयकर विवरण पत्रक वेळेवर दाखल करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे होत असतात.

# धंदेवाईक माणसाला आपल्या व्यवसाया ची किंवा धंद्याची आर्थीक परीस्थिती वेळेवर लक्षात येते कळत न कळत काही चूका असतील झाल्या असतील तर त्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने लवकर हालचाल करता येते. जेणेकरून त्या पासून होणारे आर्थीक नुकसान पुन्हा होणारं नाहीत.
#… करदात्यांने वेळेवर पत्रक दाखल केले तर ज्यादा व्याज व दंड भरावाा लागत नाही. ज्या मुळे आर्थीक भूर्दंड सोसावा लागत नाही
#…उशीरा पत्रक दाखल केल्या चे कारण योग्य नसेल तर आपला निष्काळजीपणा सिद्ध होतो त्यामुळे आयकर अधिकारी पुढं आपली विश्वासार्हता राहत नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या पत्रकाची संशयास्पद नजरेने तपासणी करतो.
#…वेळेवर काम केल्याने मानसीक ताण होत नाही नाहीतर तर आयकर विभागांची कारण दाखवा नोटीस येईल कि काय अशी धाकधूक मनात असते. ति धाकधूक राहत नाही मानसीक व व्यावसायीक समाधान मिळते.
#…वित्तीय संस्थाकडे आर्थीक पत वाढते किंवा टिकून तरी राहते. ज्या मुळे व्यवसायात आर्थीक अडचणी उदभवल्या तर वित्तीय संस्था आर्थीक मदत सहज करतात. त्या मुळे धंद्यात वाढ करण्यात मदत होते
.#…माननीय सरकारला महसुला संबंधित माहीती वेळेवर कळते त्या मुळे सरकारला आर्थिकदृष्ट्या नियोजन करायला मदत होते.
#…शेवटी शेवटी घाई केल्या मूळे सोपी कामे अवघड होतात. त्या मुळे अर्जंट तयार होते. त्यामुळे चुका होण्या ची शक्यता असते. शेवटी शेवटी धावपळ करण्या ने धावपळीत काही बर वाईट पण घडू शकते. म्हणून वेळेवर विवरण पत्रक दाखल करने फायद्याचे असते.


लाॅकडावुन मुळे किंवा काही ही कारणास्तव ज्या करदात्यांचे आर्थीक वर्ष 2018-19 चे आयकर विवरण पत्रक (ITR) दाखल करायचे राहीले आहेत त्यां करदात्यांना सदर ITR येत्या 30 जुन 2020 पर्यंत दाखल करता येणार आहे. तसेच आर्थीक वर्ष 2018-19 चे विवरण पत्रक दाखल केले आहे परंतु त्यात काही चुका झाल्या असतील किंवा काहीतरी सादर करायचे राहीले असेल तरकरदात्यां ना दुरुस्ती करून दुरूस्ती पत्रक( Revised Return) ही दाखल करता येणार आहे. तरी गरजुंनी हया सवलतीचा लाभ घ्यावा. 6 च दिवस बाकी आहेत. कारण 30 जुन नंतर इच्छा असुनही सुद्धा सतःहून सदर विवरण पत्रक दाखल करता येणार नाही…. तसेच लाॅकडावुन मुळे आयकर विभागाने आर्थीक वर्ष 2019-20..चे विवरण पत्रक ITR दाखल करायची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे….. शेवटच्या दिवसा पर्यंत बिनधास्त राहणे व शेवटी शेवटी घाई करने खुप अर्जंटगीरी दाखवण्यापेक्षा वेळेआधी सुरूवात करने वेळेवर विवरण पत्रके वेळेवर दाखल करने फायद्याचे आहे त्या मुळे उद्योजक, व्यावसायीक व पगारदार वर्गा ने आर्थीक वर्ष 2018-19 व 2019-20 चे आयकर विवरण पत्रक वेळेवर दाखल करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *