Arvind Kejriwal News: ‘ ……… अमित शहांना पंतप्रधान करण्याचा डाव’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल ५० दिवसांनी अरविंद केजरीवाल यांची तिहारमधून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल लोकसभेच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकांसंदर्भात महत्वाचे विधान केले. तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
“निवडणुकीच्या काळात मी तुरुंगातून बाहेर येईल, असे वाटले नव्हते. हनुमानजींच्या कृपेमुळेच मी तुमच्यामध्ये आलो आहे, हा एक चमत्कार घडला आहे. दिल्लीच्या जनतेचे खूप खूप आभार. भाजपने निवडणूक जिंकली तर यूपीचे मुख्यमंत्री बदलला जाईल. योगी आदित्यनाथ यांना हटवले जाईल,” असे अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

“पुढच्या वर्षी १७ सप्टेंबरला मोदी रिटायर्ड होणार आहेत. मग पुढचा पंतप्रधान कोण? योगी आदित्यनाथ यांना संपवून हे अमित शाह यांना पुढचा पंतप्रधान बनवतील. मोदी त्यांच्यासाठी नाही तर अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मत मागत आहेत. मोदींच्या नावाने मत देणाऱ्यांनी विचार करून मत द्या की तुम्ही मोदींना नाही तर शाह यांच्यासाठी मत देत आहात,” असा मोठा गौप्यस्फोटही अरविंद केजरीवाल यांनी केला.

“दिवसात २४ तास असतात मी पुढचे २१ दिवस ३६ तास काम करून दाखवणार. ४ जून नंतर यांचं सरकार बनत नाही. एकाही राज्यात यांच्या जागा वाढत नाहीत. केंद्रात INDIA आघाडीचं सरकार असेल. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार आहे. लोकशाहीला तुम्ही जेलमध्ये बंद करू शकत नाहीत, त्यामुळे मी जेलमधून लोकशाही चालवून दाखवणार,” असेही अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *