![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। पुणे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील क्रमांक १० आणि ११ या दोन फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार असल्याने रेल्वे प्रशासनाने ‘सीएसएमटी’ स्थानकावर येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या दादरपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यात पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी गाड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ”एमएसटी” धारकांसह सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

या गाड्या रद्द :
पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस (ता. २८मे ते २ जून )
पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (ता. ३१ मे ते २ जून )
पुणे- मुंबई -पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून )
पुणे- मुंबई -पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून )
कुर्ला – मडगांव – कुर्ला (ता. १ व २ जून )
या गाड्या दादरपर्यंत धावणार :
साई नगर शिर्डी – मुंबई -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
भुवनेश्वर – मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
हैदराबाद – मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस
होस्पेट – मुंबई – होस्पेट एक्स्प्रेस
मुंबई -चेन्नई – मुंबई चेन्नई एक्स्प्रेस
(वरील रेल्वे १७ ते २७ मे दरम्यान दादर स्थानकापर्यंत धावतील. परतीचा प्रवास दादर येथूनच सुरवात करतील. )