महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। महाराष्ट्रासह देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे. महाराष्ट्रातील काही विभागातील मतदान प्रक्रिया पार पडली असून काही विभागातील मतदान अजूनही बाकी आहे. याच निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक सर्वसामान्य जनतेचे लक्ष हे भाजीपाल्याच्या किंमतीपासून ते सिलेंडरच्या दरावर आहेत.
मात्र एका बाजूला भाजीपाल्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आहे. महत्त्वाचे म्हणजे कांद्या पाठोपाठ आता बटाट्याच्या(potato) दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे प्रत्येक घरातील स्वयंपाक घरातून बटाटा गायब झालेला आहे.
सर्वसामान्यांसाठी भाजीपाल्यांच्या दरात जराही भाव वाढ होताच त्याचे महिन्याचे बजेट कोलमडते. त्यातच देशात कडक उन्हाचा प्रत्येकाला सामना करावा लागतोय तर दुसऱ्या बाजूस अवकाळी पावसाचा(rain) कहर सुरु आहे. निसर्गाच्या या अवेळी चालू असलेल्या खेळीचा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतीवर होतो. त्यातच भाजीपाल्यातील बटाट्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. फक्त बटाट्याच्या किंमती वधारल्या नसून अन्य भाज्यांच्या किंमतीत देखील वधारल्या आहेत.
बटाट्यांचे भाव वधारता टोमॅटोच्या दरात घट…
सध्या बटाट्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र त्याच सोबत टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे,त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. साधारण टोमॅटोच्या दरात ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांपर्यंत बटाट्यांची नवीन आवक बाजारात येत नाही तो पर्यंत बटाट्याच्या किंमतीत वाढ राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.