Pimpri Chichwad : पाण्याचा जपून वापर करा ; पवना धरणात 28.93 टक्के पाणीसाठा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या ( Pimpri ) पवना धरणात 28.93 टक्के तर आंद्रा धरणात 35.37 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यास परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

शहरासाठी महापालिका पवना धरणातून दररोज 520 एमएलडी पाणी घेते. हे पाणी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा केंद्रात उचलले जाते. तेथून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून ते संपूर्ण शहरात पुरविले जाते. गेल्या काही दिवसापांसून आंद्रातून होणारा अपुरा पाणी पुरवठा आता सुरळीत झाला असून महापालिका 80 एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलते.

हे पाणी चिखली जलशुद्धीकरण आणले जाते. तेथे पाणी शुद्ध करून चिखली, मोशी, च-होली, भोसरी परिसरातील नागरिकांना दिले जात आहे. एमआयडीसीकडून महापालिका सध्या 15 एमएलडी पाणी असे एकूण 615 एमएलडी पाणी शहराला दिले जात आहे.

पवना धरणात आजच्या तारखेला 28.93 टक्के पाणीसाठा असून हा 15 जुलै पर्यंत पुरेल एवढा आहे. परंतु, गतवर्षी 30.92 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत 1.99 टक्के कमी साठा आहे. तर, आंद्रा धरणात 35.37 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाण्याची चिंता नाही. परंतु, पावसाने ओढ दिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले ( Pimpri ) आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *