RCB विरोधातील सामन्यानंतर माही IPLला अलविदा करणार? CSK च्या माजी खेळाडूने केलं जाहीर, म्हणाला ‘तो आता…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । IPL 204 MS Dhoni Retirement: आयपीएल हंगाम आता लीग सामन्यांच्या शेवटच्या टप्प्यात दाखल झाला आहे. शनिवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात सामना होणार आहे. प्लेऑफसाठी तीन संघ पात्र ठरले असताना चौथ्या जागेसाठी ज्या संघांमध्ये चुरशीची लढत आहे त्यात चेन्नई आणि बंगळुरु हे दोन्ही संघ आहेत. अशात हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावतील. दरम्यान या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी आपली निवृत्ती जाहीर करु शकतो अशी चर्चा रंगली आहे. चेन्नई संघ घरच्या मैदानावरील अखेरचा सामना आधीच खेळलं असून, आता बंगळुरुविरोधात एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सामना होईल.

RCB सध्या 13 सामन्यानंतर 6 विजय आणि 7 पराभवांसह 12 गुणांच्या मदतीने क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, CSK 13 सामन्यांनंतर 14 गुणांसह 7 विजय आणि 6 पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे. प्लेऑफसाठी पात्र व्हायचं असल्याने सध्या दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती आहे.

भारताचा आणि चेन्नईचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा याने महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केलं आहे. धोनी आपली निवृत्ती जाहीर करेल असं वाटत नसल्याचं रॉबिन उथप्पाने म्हटलं आहे. “चेन्नई सुपरकिंग्ज संघाबद्दल बोलायचं हा धोनीचा शेवटचा सामना असेल का? मला स्वत:ला तसं वाटत नाही. मला वाटत नाही की तो निवृत्ती जाहीर करेल. पण त्यांना बंगळुरुच्या पार्टीत व्यत्यय आणायचा आहे का? हो नक्कीच. आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्या हंगामात ऋतुराजची नॉकआऊट स्टेजमध्ये दाखल होण्याची इच्छा असेल. त्याच्यासाठी आणि चेन्नई संघाचं मनोबल वाढवण्यासाठी ही फार मोठी गोष्ट असेल. दीर्घ काळासाठी हे महत्त्वाचं असेल. पुढे काय होतं हे पाहावं लागेल,” असं रॉबिन उथप्पाने म्हटलं आहे.

या हंगामात धोनीने 10 सामन्यात 161 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 226.66 राहिला आहे. खालच्या क्रमांकावर मैदानात येणाऱ्या धोनीने छोटी खेळी करतही सामन्यांवर आपला प्रभाव पाडला आहे.

दरम्यान, बंगळुरुला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्यास विजय मिळवणं आवश्यक आहे. तसंच इतर निकालही त्यांच्या बाजूने लागण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे चेन्नईसाटी फक्त विजय झाली तरी पुरेसा असेल. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB विरुद्ध धोनीने नऊ सामने खेळले आहेत आणि 125.33 च्या सरासरीने आणि 184.31 स्ट्राइक रेटने 376 धावा नोंदवल्या आहेत. दरम्यान, त्याने चार अर्धशतकेही ठोकली आहेत.

क्रिकेटमधील भारताचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार विराट कोहली आणि धोनी या सामन्यात एकमेकांविरोधात उभे असणार आहे. कोहली या हंगामात आरसीबीचा स्टार खेळाडू आहे, त्याने 13 सामन्यांमध्ये 155.16 च्या स्ट्राइक रेटने 661 धावा केल्या आहेत. या मोसमात, त्याने एक शतक आणि पाच शतकेही झळकावली आहेत आणि ऑरेंज कॅप शर्यतीत तो अव्वल आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *