महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। सलग दोन-दिवस सोने चांदीच्या किंमती घसरल्यानंतर आज सोन्यासह चांदीने देखील मोठी उसळी घेतली आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे एक हजाराने तर चांदीचे प्रती किलोसाठी 3 हजार रुपयांनी दर वाढले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे या शहरांमधील किंमती देखील वाढल्या आहेत.
जागतिक बँकांचे व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपली गुंतवणूक वळवल्यामुळे सोन्यात सातत्याने भाव वाढ होत असल्याचं दिसत आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव 76 हजार 200 जीएसटीसह तर चांदीचे भाव प्रति किलो 91 हजार इतके झाले आहेत.
जळगावच्या बाजारात सोने व चांदीने उच्चांकी घेतली असून सोन्याचे भाव हे 1000 रुपयांनी तर चांदीचे भाव हे प्रति किलो तीन हजार रुपयांनी वाढले असून सोने-चांदी चे भाव हे सर्वसामान्य नागरिकांच्या अव्यकाच्या बाहेर पोहचले आहेत.
मुंबई पुण्यातील सोने-चांदीच्या किंमती
२२ कॅरेट सोनं ६,७५९ प्रति तोळा, तर २४ कॅरेट ७,३७४ आणि १८ कॅरेट सोनं ५,५३० रुपये प्रति ग्रामने विकलं जात आहे. तर चांदी मुंबईत आणि पुण्यात ९३,००० प्रति किलो आहे. पुढील काळात सोन्यात आणखी भाव वाढ होणार अशी शक्यता सोने व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.