महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – :दि.२५-बीड , :अंबाजोगाई:बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याच्या बळावर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आता १.५ टेस्ला’ ऐवजी आधुनिक ३.० टेस्ला एमआरआय मशीन’ खरेदीस मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती मा.ना.मुंडेंनी दिली.पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपययोजनांमध्ये कमालीचे सतर्क असून मागील महिन्यात त्यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून रखडलेली एमआरआय मशीनची मागणी मार्गी लागली होती. त्यावेळी ९ कोटी ५२ लक्ष रुपये किंमतीच्या १.५ टेस्ला क्षमतेच्या एमआरआय मशीन खरेदीस परवानगी देण्यात आली होती.मात्र ३.० टेस्ला क्षमतेची अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त टर्न की ट्रान्सफॉर्मर असलेली मशीन स्वाराती मध्ये मिळावी यासाठी ना. मुंडे प्रयत्नशील होते.
३.० टेस्ला एमआरआय सिस्टीम टर्न की ट्रान्सफॉर्मर’ एकूण १७ कोटी ३२ लक्ष ५१ रूपयेच्या यंत्रसामुग्री मुळे रुग्णांवर अतिशय आधुनिक तपासण्या अंबाजोगाई येथे होतील. याचा फायदा जिल्ह्यातील गरजू व गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात होईल व वैद्यकीय उपचारातील मोठ्या खर्चात बचत होणार आहे तसेच एम.आर.आय.तपासणी साठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याचेही आता टळणार आहे.यापूर्वी राज्य शासनाने शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र शासनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या श्रेणीवर्धनासाठी मंजूर अनुदानातून १.५ टेस्ला एमआरआय मशीन विथ टर्न की’ ही नऊ कोटी बावन्न लक्ष रुपयेची यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मान्यता दिली होती.परंतु ३.० टेस्ला एम.आर.आय.या आधुनिक यंत्रणेमुळे रुग्णांना वैद्यकीय तपासणी साठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही. या यंत्रसामुग्री खरेदी करण्यास आवश्यक असणारा अतिरीक्त निधी जिल्हा वार्षिक योजनेतर्गत उपलब्ध होणार असल्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून स्वाराती रुग्णालयात लवकरच ही अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त एमआरआय मशीन दाखल होणार आहे.
या पूर्वी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास सात नावे व्हेंटिलेटर जिल्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास हाफकिन महामंडळ मार्फत नवीन सात व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. हाफकिन जीव -औषध निर्माण महामंडळाचे राजेश देशमुख यांनी ना धनंजय मुंडे यांच्या विनंती वरून हे सात व्हेंटिलेटर त्यांच्या सी एस आर निधीतून या रुग्णालयाला मोफत दिले आहेत. आजपरेंत सदरील रुग्णालयात 13व्हेंटिलेटर होते त्यापैकी 3 व्हेंटिलेटर हे कोविड 19साठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर उर्वरित 10 व्हेंटिलेटर हे इतर रुग्णांनसाठी ठेवले आहेत
मा.ना.धनंजय मुडे हे गेल्या आठवड्यात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास भेट दिली होती त्यांनी त्यावेळेस रुग्णालयातील साधन साम्रगी विषयी चर्चा करण्यात आली होती. बीड जिल्यात कोविड 19या विषाणू ने शिरकाव केले असल्यामुळे हाफकिन महामंडळाच्या राजेश देशमुख यांच्याशी संवाद सादून ही सात व्हेंटिलेटर रुग्णालयास दिली आहेत. याचं प्रमाणे या रुग्णालयास एम आर आय मशीन सुद्धा लवकरच मिळून देण्याचेआश्वासन मा.ना धनंजय मुंडे यांनी रुग्णालयास दिली होते तशी मागणी हाफकिन महामंडळास केली असल्याचे सांगण्यात आले आहे. ती सात व्हेंटिलेटर ही रुग्णालयास उपलब्ध झाली आहेत.या व्हेंटिलेटर मुळे रुग्णालयास नवसंजीवनी मिळाल्या सारखे वाटत आहे यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी फार मोट्या प्रमाणात मदत झाली आहे.असे या रुग्णालयाचे अधिष्टता ड्रा. सुधीर देशमुख यांनी रुग्णालयास साहित्य उपलब्ध करून दिल्या मुळे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.