महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर परिसरातील अरणेश्वर हाउसिंग सोसायटी मधील एका फ्लॅटला आज (साेमवार) दुपारी भीषण आग लागली. या आगीत एक 3 बीचएकके फ्लॅट संपुर्णत: जळून खाक झाला. या घटनेत काेणतीही जिवीत हानी झालेली नसून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. (Maharashtra News)
अरणेश्वर हाउसिंग सोसायटी मधील दुपारी एक वाजता दरम्यान ए विंग मधील पहिल्या म्हजल्यावरील फ्लॅट नंबर 3 च्या बेडरूमला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पाेहचले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या फ्लॅटमधील बेडरूमला लागलेल्या आगीमुळे संपुर्ण साहित्य जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी बालाजी वैद्य म्हणाले आम्ही घटनास्थळी पाेहचल्यानंतर प्रथम आजीची घरातून सुटका केली. ही आग संपुर्णत: विझविण्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.