महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। अमूल दुग्धजन्य पदार्थ आता अमेरिकेतही उपलब्ध होणार आहेत. कंपनीने अमेरिकेत व्यवसाय करण्याची पूर्ण तयारी केली आहे. अमूल हा भारतातील लोकप्रिय ब्रँड असून ‘अमूल दूध पीता है इंडिया’ ही टॅगलाइन खूप प्रसिद्ध आहे. आता ‘अमूल दूध पिता है अमेरिका’ या अशी टॅगलाइन अनेकांनी बनवली आहे. तर कंपनी आता अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आणि आशियाई लोकांवर लक्ष केंद्रित करणार असून अमेरिकेत या लोकांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे कंपनीच्या व्यवसायाला आधार मिळेल.
देशातील अमूल ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूल ब्रँडचे दूध अमेरिकेत विकण्यासाठी अमेरिकन डेअरी ‘मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’सोबत नुकताच करार केला होता. १०८ वर्षे जुन्या अमेरिकन कंपनीसोबत झालेल्या करारानंतर GCMMF ही अमेरिकेतील डेअरी क्षेत्रात काम करणारी पहिली कंपनी बनली आहे. रिपोर्ट्सनुसार, जर आपण पॅकेजिंगबद्दल बोललो तर अमूल अमेरिकेत एक गॅलन म्हणजे ३.८ लिटर आणि अर्धा गॅलन म्हणजेच १.९ लिटरच्या पॅकेजिंगमध्ये दूध विकेल.
अमेरिकी लोकांना ताजे दूध
आपले ताजे दूध भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांना उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी, शिकागो, वॉशिंग्टन, डॅलस आणि टेक्सास सारखी मोठी शहरे आहेत. ही शहरे निवडण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांची मोठी लोकसंख्या होय. ही कंपनी अंबानी, टाटा आणि अदानी सारख्या मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमूलमध्ये १५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे. अमूल उत्पादन, प्लांट कामगार, वाहतूक, विपणन, वितरण आणि विक्री या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करत असून 3५ लाखांहून अधिक शेतकरी अमूलशी संबंधित आहेत. तर कंपनीचे ८७ प्लांट आहेत, जे दुग्धजन्य पदार्थ, मिठाई इत्यादींचे उत्पादन करतात.
गावातून सुरू झाला व्यवसाय
गुजरातमधील एका गावातून सुरू झालेल्या या व्यवसायात शेतकरी, मेंढपाळ, पशुपालक आणि महिलांचा समावेश होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेत अमूलचे मोठे योगदान आहे. अमूल ग्रामीण अर्थव्यवस्थेत दररोज सुमारे ३०% योगदान देते. अमूलचा दावा आहे की ही एक सहकारी संस्था आहे जी आपल्या कमाईतील ८०$ लाभ शेतकऱ्यांना देते.
अमूलने सतत आर्थिक वाढ कायम ठेवली. आनंद मिल्क युनियन लिमिटेड (AMUL) ही एक दुग्ध सहकारी संस्था आहे. ही गुजरातमधील आनंद येथे आहे. अमूल ब्रँड गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) अंतर्गत आहे. आज १५ दशलक्षाहून अधिक दूध उत्पादक अमूलच्या देशभरातील १४४,५०० दुग्ध सहकारी संस्थांना त्यांचे दूध वितरीत करतात.