Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। HSC Result ( Marathi News ) : राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. ‘सीबीएसई’ परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार मंगळवार २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ५२ हजार ८७० विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी १८२ केंद्रांवरून परीक्षा दिली. परीक्षा कालावधीत कॉफीचा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती.

परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी…

महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत mahahsscboard.in, mahresult.nic.inresults.gov.in संकेतस्थळावर जा

महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा

HSC निकाल लिंकवर क्लिक करा

रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा

१२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल

पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल

संकेतस्थळावर जा

महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा

HSC निकाल लिंकवर क्लिक करा

रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा

१२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल

पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *