महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरुच आहेत. सोमवारी सोन्याच्या किंमती थोड्या कमी झाल्या होत्या तर आज मंगळवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. चांदीच्या किंमतीत सोमवारी मोठी वाढ झाली होती. चांदीचे दर तब्बल २ हजार ५०० रुपयांनी वाढले. त्यानंतर आजही चांदीच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे.
सोन्याच्या किंमती वाढण्याचं कारण काय?
अमेरिकेच सोन्यासह चांदीची गुंतवणूक वाढली आहे. तसेच चीनकडून देखील सोने खरेदी वाढली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच सोने आणि चांदीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. अक्षय्य तृतीयेला देखील दर वाढले होते. अशात आजच्या सोने-चांदीच्या किंमती काय आहेत याची माहिती घेऊ.
आजचा सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्यात. १०० ग्राम सोन्याची किंमत ६,९०,६०० रुपये इतकी आहे. २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,५३,२०० रुपये इतकी आहे. तर १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,६५,१०० रुपये इतकी आहे.
मुंबईतील दर
मुंबईत १८ कॅरेट ५,६३८ रुपये, २२ कॅरेट ६,८९१ आणि २४ कॅरेट ७,५१७ रुपये प्रति ग्राम दर आहे.
पुण्यातील सोन्याच्या किंमती
पुण्यात २२ कॅरेट ६,८९१, १८ कॅरेट ५,६३८ रुपये आणि २४ कॅरेट ७,५१७ रुपये प्रति ग्राम दर आहे.
चांदीच्या किंमती
आज चांदीच्या किंमतीत प्रति किलो १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काल चांदी ९६,५०० रुपये किलो होती. तर आज चांदी ९६,६०० रुपये प्रति किलो आहे. मुंबईसह पुण्याच चांदीच्या किंमती ९६,६०० रुपये प्रति किलो आहे.