![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। राज्यात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून (Monsoon 2024) लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राज्यात उन्हाचा तडाका वाढतोय. तर दुसरीकडे मान्सून आगेकूच करतोय. 9 तारखेला अंदमानात दाखल झालेला मान्सून आता 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत मान्सूनचं नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा विदर्भात आगमन होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मान्सून अगोदर काही दिवसात उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रीवादळ धडकलंय. परिणामी महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या लाटा उसळत आहे. . अनेक भागांमध्ये किनाऱ्यावर उंचच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे.मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात अवकाळीबरोबरच 1 जूनपर्यंत उष्णतासदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आहे. यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा 43 अंशांवर गेला आहे.
राज्यात उष्णतेचा अलर्ट
राज्यासह देशात तापमान चांगलेच वाढले आहे. देशात अनेक राज्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात 10 जूनच्या आसपास प्रवेश करण्याची शक्यता आहे. कोकणात आल्यनंतर 15 जून दरम्यान कोकणातून घाटमाथा ओलांडून खानदेश, , नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 20 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर पसरण्याचा अंदाज आहे.
महाचक्रीवादळाचा वेग 130 किमीपेक्षा जास्त
बंगालच्या उपसागारात तयार झालेल्या रेमल महाचक्रीवादळाचा वेग 130 किमीपेक्षा पुढे जाणार आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळून वादळ आज बांगलादेशकडे जाणार आहे. जोरदार हवा आणि पाऊस सुरु झालाय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशात एनडीआरएफची टीम दाखल झालीय. रेमल वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय, तर आजूबाजूच्या दहा राज्यांना पावसाचा इशाराही देण्यात आलाय. तर कोलकातामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोलकातामधील विमान सेवा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
