Pune Porsche Accident: “मी ………..,” पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीने पुणे पोलिसांनना काय काय सांगितले?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुन ।। पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी भयंकर अपघात झाला होता. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारणे दोघांना उडवले होते. ज्यामध्ये दोन्ही पीडितांचा मृत्यू झाला होता.

हा अपघात घडला तेव्हा गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलगा नशेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या मुलाला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर, या अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आई-वडील आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आता प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आले आहे. शनिवारी पुणे पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीची येरवडा निरीक्षण गृहात चौकशी केली. यावेळी आरोपीने पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पुणे पोलिसांनी शनिवारी येरवडा निरिक्षण गृहात अल्पवयीन आरोपीची सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 पर्यंत तब्बल तासभर चौकशी केली. यावेळी अल्पवयीन आरोपीने पुणे पोलिसांना सांगितले की, अपघात घडला त्यावेळी तो मद्यधुंद असल्याने त्याला तेव्हाचे काहीच आठवत नाही.

या चौकशीवेळी शनिवारी अटक करण्यात आलेली अल्वपयीन आरोपीची आई, सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची चौकशी करण्यात आली.

या प्रकणात आम्हाला आणखी माहिती हवी आहे, त्यासाठी अल्पवयीन आरोपीची चौकशी केली. पण चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलाने कोणतेही सहकार्य दिले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

“आमच्या अधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीला अपघातापूर्वीचे त्याचे ठिकाण, ब्लॅक आणि कोसी पबमध्ये त्याची उपस्थिती, पोर्शे चालवणे, अपघाताचा तपशील, पुराव्याशी छेडछाड, रक्ताचे नमुने गोळा करणे आणि वैद्यकीय चाचण्या याबद्दल विचारले. सर्व प्रश्नांना, अल्पवयीन मुलाचे एकच उत्तर होते, तो दारूच्या नशेत असल्याने त्याला काहीही आठवत नव्हते,” अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीच्या आईला अपघातानंतर रक्ताचा नमुना बदलण्यास मदत केल्याबद्दल शनिवारी ताब्यात घेण्यात आल्याचे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आणि आजोबांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते, त्यामुळे अल्पवयीन कुटुंबातील ही चौथी अटक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *