Varanasi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। लोकसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ६००० मतांनी पिछाडीवर गेल्याने भाजपाच्या गोटात शांतता पसरली होती. परंतु पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये मोदींनी आघाडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६००० हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. आता मोदींनी ९००० मतांची आघाडी घेतली आहे. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्यापेक्षा १० हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.


उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे.

2019 मध्ये सपा-बसपा-आरएलडीची युती होती आणि काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली होती. मात्र, युती होऊनही सपा-बसपाला फारशा जागा जिंकता आल्या नव्हत्या. युतीला केवळ 15 जागा मिळाल्या होत्या, तर एकट्या भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. अपना दल (एस)ला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली. आता यामध्ये मोठा उलटफेर होण्याचे संकेत मिळत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *