Satara Lok Sabha Election Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। सातारा ।। Satara Lok Sabha Result 2024 सातारा लोकसभा मतदार संघाच्या चौथ्या फेरीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या फेरीत शशिकांत शिंदे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (udayanraje bhonsle) आघाडीवर होते. सहा विधानसभा मतदारसंघात मिळून त्यांना पहिल्या फेरीत २७ हजार ५५६ तर शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते मिळाली होती. मात्र दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेत उदयनराजे भोसले यांना पिछाडीवर टाकले.

राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवातीपासूनच शशिकांत शिंदेंनी घेतलेली आघाडी कायम आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *