![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुन ।। कमोडिटी बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली तर देशांतर्गत वायदे बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या भावात वाढ नोंदवली जात आहे. सकाळी सुरुवातीच्या सत्रात सोन्याचा वायदा ३०० पेक्षा अधिक वाढला तर चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. सोन्याचा भाव आता ७२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला तर चांदीच्या दरातही झपाट्याने वाढल्या आणि बुधवारी ५ जून रोजी MCX वर सोन्या-चांदीमध्ये चांगली वाढ नोंदवली गेली.
निवडणूक निकालानंतर सोन्या-चांदीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच देशात भाजप युतीचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, निवडणूक निकालांचा परिणाम केवळ शेअर बाजारातच दिसून आला नाही तर सोन्याच्या किंमतीवरही निकालाचे पडसाद उमटले. निवडणूक निकालानंतर बुधवारी ५ जून रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आणि राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ७३,०८० रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याचा दर महागला
मंगळवारच्या तुलनेत सोन्याची किंमत बुधवारी १०० रुपये प्रति १० ग्रॅमने ६०० रुपयांनी महागली तर चांदीची किंमत ९४,१०० रुपये प्रति किलो झाली असून देशातील १२ मोठ्या शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या किंमती जाणून घेऊया.
दिल्लीत ४ जून २०२४ रोजी २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,०३० रुपये झाली असून मुंबईत सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,८१० रुपये झाला असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,८८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६,८६० आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९३० रुपये झाला आहे.
