![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुन ।। आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी आयकर (ITR) रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जुलै रोजी अंतिम मुदत संपणार आहे. म्हणजे विहित मुदतीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यास करदात्यांना दंडही भरावा लागू शाळतो. अशा परिस्थितीत, करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना विशेष काळजी घेतली पाहिजे, परंतु काही वेळा लोक रिटर्न भरताना नकळत किंवा मुद्दाम काही चुका करतात ज्या सुधारता येतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
ITR भरताना चूक झाल्यास काय करावं
आयकर रिटर्न भरताना सावधगिरी बाळगली पाहिजे, परंतु तरीही नकळत काही चूक झाल्यास सुधारित रिटर्न देखील भरता येते, पण एक करदाता रिवाइज्ड रिटर्न किती वेळा फाइल करू शकतो? आयकर विभाग कायदा १९६५ च्या कलम १३९(५) अंतर्गत करदात्यांना सुधारित ITR भरताना झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळते. होय, म्हणजे ITR भरताना करदात्यांकडून छोटीशी झालेली चूकही सुधारता येऊ शकते.
सुधारित ITR किती वेळा फाईल करू शकतो
प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार विहित मर्यादेत पाहिजे करदाता शक्य तितक्या वेळा सुधारित ITR फाईल करू शकतो. म्हणजे आयटीआर भरण्याच्या अंतिम मदतीपर्यंत सुधारित ITR भरण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु सुधारित आयटीआर भरताना संपूर्ण माहिती प्रविष्ट करणे गरजेचे असून सुधारित ITR दाखल केल्यानंतर पडताळणी केली नाही तर आयकर विभाग तुमचे कर विवरणपत्र अस्वीकार करेल आणि अंतिम मुदतीनंतर तुमचा ITR अवैध ठरवला जाईल. अशा परिस्थितीत, सुधारित आयटीआर दाखल केल्यानंतर सत्यापित करणयाची खात्री करा.
