8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत पुढील वर्षी येऊ शकते आनंदाची बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। केंद्रात पुन्हा सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. येत्या रविवारी म्हणजे ९ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील, अशी चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत, नवीन स्थापन होणाऱ्या सरकारकडून जाणतेसह त्यांच्या कर्मचाऱ्यांची नवीन अपेक्षा असतील. तर नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वीच सरकारचा मूड बदलून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अटकळ आता बांधली जात आहेत.

आठव्या वेतन आयोगयावर सरकारचा मूड बदलणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील नवीन सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे. त्याचेवेळी, पुढील वर्षापर्यंत मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी होऊ शकते. नवीन सरकार स्थापन झाल्यास याबाबत चारही सुरू होईल, तर पुढील वर्षी केंद्र सरकार पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट देऊ शकते. आतापर्यंत आठवा वेतन आयोग लागून होणार नाही, अशी चर्चा होती पण पुढील वेतन आयोगाची तयारी लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

मात्र, नवी वेतन आयोग लागू करण्यावर सरकारमध्ये अद्याप एकमत नसून नव्या सरकारमध्ये याबाबतची चर्चा नव्या पद्धतीने सुरू होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनातही यावर चर्चा होण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर पुढील वेतन आयोगावर चर्चा होऊ शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार घसघशीत वाढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांचा पगारात सर्वात मोठी वाढ होऊ शकते. नव्या वेतन आयोगात काय येणार आणि काय नाही, याबाबत आत्ताच सांगणे कठीण असल्याचेही सूत्रांचे म्हटले असून याबाबत कोणताही नियोजन आयोग स्थापन केला जाणार का, की अर्थ मंत्रालय ही जबाबदारी उचलणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आगमी दोन महिन्यांत समिती स्थापन होण्याची शक्यता असून त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या सूत्राबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात सर्वकाही सुरळीत झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित असून कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर ३.६८ पटीने वाढेल तसेच फॉर्म्युला काहीही असो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४४.४४% वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *