महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। राज्यात लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला ७ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे केंद्रात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळले अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रतापराव जाधव किंवा श्रीरंग बारणे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिपदी लागू शकते. मंत्रिपदासाठी या दोन खासदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सूरू आहे. ९ तारखेला नरेंद्र मोदींसह इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. याच दिवशी शिंदे गटाचा एक खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे. भविष्यात शिंदे गटाणा आणखी एक मंत्रिपद दिले जाईल असे आश्वासनही भाजपने शिंदे गटाला दिले आहे असेही सांगितले जात आहे.