…तर माझ्या कंपनीत अॅपलवर बंदी घालेन! एलोन मस्कचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुन ।। Apple कंपनीची उत्पादनं ही त्यांच्या यूनिक फिचर्स आणि डेटा सुरक्षित राखण्याच्या दृष्टीनं म्हत्त्वाची मानली जातात. यामुळे त्यांच्या किंमती आणि ग्राहकवर्ग कायमच उंची पसंदवाला राहिला आहे. मात्र आता जगभरातील बडे उद्योगपतींच्या रांगेत अग्रक्रम असलेले एलॉन मस्क अॅपलवर चांगले संतापले असून त्यांनी थेट इशाराच दिला आहे.

Apple च्या वार्षिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कंपनीनं त्यांच्या उपकरणांमध्ये होणाऱ्या अपग्रेड्सची माहिती प्रसिद्ध केली. iOS 18 च्या सॉफ्टवेअर अपग्रेडमध्ये AI च्या वापरावर प्रकाश टाकला. इव्हेंट दरम्यान, Apple ने पुष्टी केली की ते चॅटबॉट म्हणून वापरण्यासाठी उपकरणांमध्ये ChatGPT समाविष्ट करण्यासाठी OpenAI सोबत टाय-अप करतील. मात्र या घोषणेने एलॉन मस्क कमालीचे नाराज झाले आहेत.

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी X वर लिहिलं की ते OpenAI-Apple भागीदारीच्या बातमीनं निराश झाले आहेत. आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी पोस्ट केलं की जर OpenAI आयफोनच्या OS वर आलं तर, त्यांच्या कंपन्यांमध्ये यापुढे अॅपलची उपकरणे वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. टिम कूकला उत्तर देताना, अॅपलचे सीईओ, मस्क म्हणाले, ‘हे नको आहे (ऍपल इंटेलिजन्स). एकतर हे भयानक स्पायवेअर थांबवा नाहीतर माझ्या कंपन्यांमधून अॅपलच्या सर्व उपकरणांवर बंदी घातली जाईल’.

याव्यतिरिक्त, त्यांनी इतक्या टोकाची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे की, आपल्या कार्यालयाच्या इमारतीत Apple चे कोणतेही उपकरण आणले जाणार नाही याची खात्री केली जाईल. म्हणजेच ‘कंपनीत कामानिमित्त भेट देणाऱ्यांना देखील त्यांचे अॅपल डिव्हाइसेस कंपनीच्या दारातच दाखवाले लागतील आणि तेथेच लॉकरमध्ये ठेवले जातील’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *