Rajya Sabha By Election: अजित पवार गटाकडून राज्यसभेची माळ कुणाच्या गळ्यात? आज उमेदवार जाहीर होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे आता राज्यसभेच्या एका जागेसाठी २५ जूनला निवडणूक होणार आहे. प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोट निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलं आहे.

तर राष्ट्रवादीतील एका गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात (Maharashtra Politics) आहे. पार्थ पवार यांनी देखील कुटुंबातील सदस्य खासदार व्हावा, यासाठी मंगळवारी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आज अजित पवार गटाकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं (Rajya Sabha By Election) आहे.

आता प्रफुल पटेल यांच्या रिक्त जागेवर अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर आता राजकीय गणितं कशी बदलतात, हा एक उत्सुकतेचा विषय ठरत (Praful Patel Resign) आहे. तर काल अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्री पद द्या, अशी मागणी देखील केली आहे. तर पार्थ पवार, छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सध्या अजित पवार गटात सुरू आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली होती. त्यामुळे शरद पवार गटाने प्रफुल पटेलांना विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. परंतु प्रफुल पटेल यांनी राज्यसभेचा मार्ग स्विकारला (Ajit Pawar Group) होता. त्यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून त्यांची मुक्तता झाली. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. आता २५ जून रोजी या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *