महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अनलॉक नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ५ हजारांच्या टप्प्यात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांमध्ये तब्बल 5493 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626वर गेला आहे. तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7429 वर गेला आहे.