‘व्हिटॅमिन बी 12’च्या कमतरतेची ‘ही’ लक्षणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। व्हिटॅमिन बी 12 शरीराच्या अनेक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे आरोग्यासाठी इतके महत्त्वाचे आहे की, त्याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला दररोज थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल, तर याचा अर्थ शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकते. हे एक जीवनसत्व आहे, ज्याची कमतरता स्नायूंपासून हाडांपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करू शकते. याच्या कमतरतेमुळे शरीरात विविध बदल दिसून येतात. हे समजून घेतल्यास या सर्वांवर या जीवनसत्वाच्या पूरक आहाराने सामना करता येतो. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्यामुळे कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घ्या.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शारीरिक, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक लक्षणे दिसू शकतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे हळूहळू विकसित होऊ शकतात आणि कालांतराने खराब होऊ शकतात. काही लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी असूनही त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेच्या सामान्य शारीरिक लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे – खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, मळमळ, उलट्या किंवा अतिसार, नेहमीप्रमाण लागणे, वजन कमी होणे, तोंडात किंवा जिभेत वेदना होणे, पिवळी त्वचा, हात आणि पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, द़ृष्टीची समस्या, गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होणे किंवा सहज गोंधळ होणे,चालायला किंवा बोलण्यात अडचण, उदासीनता, चिडचिडेपणा, तुमच्या भावना आणि वागणुकीत बदल. या जीवनसत्वासाठी सफरचंद, केळी, संत्री यासारखी फळे तसेच पालक, बटाटा, मशरूम यांचे सेवन करणे महत्त्वाचे ठरते. सोया मिल्क,बदाम, दही, अंडी, मासे, चिकन-मटण यामधूनही हे जीवनसत्व मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *