अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। एअरलाईन कंपनी स्पाईसजेटने हैदराबाद-अयोध्या थेट विमान सेवा बंद केली आहे. प्रवाशांची मागणी घटल्याने स्पाईसजेटने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबादवरून अयोध्येला जाण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहिती नुसार, अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यामुळे मागणी कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुग्राममधील एअरलाइनने आपले अखेरचे उड्डाण 1 जून केले होते.

मागणीनुसार चालवली जातात विमानं –
स्पाइसजेटने हैदराबादहून अयोध्येसाठीची विमान सेवा बंद केली असली, तरी अयोध्या-चेन्नई मार्ग अद्याप सुरू आहे. तसेच, व्यावसायिक व्यवहार्यता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उड्डाणे निर्धारित केली जातात. असेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

21 जानेवारीला करण्यात आले होते विशेष उड्डाण –
रामलला प्राणप्रतिष्ठा समारंभासाटी स्पाइसजेटने 21 जानेवारीला एक विशेष विमान चालवले होते. ज्याचे उड्डाण दिल्लीहून झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 डिसेंबरला अयोध्येत महर्षि वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर 31 जानेवारीला, आपण दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा स्पाइसजेटने केली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *