महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – जालना – ता. ३० – जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत या महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे.आज मंगळवारी सकाळी तब्बल 31 रुग्णसंख्या वाढली असून त्यात जालना शहरातील 27 तर जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील 4 रुग्णांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. या 31 रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 554 वर पोहचली आहे.जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे 84 संशयीत रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले होते.
त्यापैकी 31 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील 4 रुग्णांसह जालना शहरातील विणकर मोहल्ला 7, हॉटेल अमित जवळील 3,वसुंधरा नगर 3, जुना जालना भागातील संजोग नगर 2,मस्तगड,भरत नगर,व्यंकटेश नगर,जेपीसी बॅंक कॉलनी,बरवार गल्ली,संभाजी नगर,सत्कर नगर,अकेली मस्जिद,मिशन हॉस्पिटल, मंगल बाजार,नरीमन नगर, आणि पेन्शनपुरा या भागातील प्रत्येकी एक या प्रमाणे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.जालना शहरातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून होत असलेली वाढ ही शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब असून प्रशासनही हादरून गेले आहे.
