आर्थीक वर्ष 2019-20 साठी ज्या वैयक्तिक करदात्यांचे उत्पन्न पाच लाखा पेक्षा थोडंस जास्त होणार आहे अशा करदात्यां नी 31 जुलैच्या आत हजार पाचशे ची गुंतवणूक केली तर रु.12,500/-चा टॅक्स वाचवू शकतात :—-..पि.के.महाजन.जेष्ठ कर सल्लागार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – ता. ३० – आर्थीक वर्ष 2019-20 साठी वैयक्तिक करदात्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाखांच्या पुढे थोडे फार जात असेल तर 31 जुलैच्या आत आयकर कलम 80C किंवा 80D खाली हजार पाचशे ची गुंतवणूक केली तर कलम 87A नुसार रु.12,500/-चा टॅक्स वाचू शकतो: आर्थीक वर्ष 2019-20 मधील वैयक्तीक करदात्यांसाठी ज्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाखाच्या थोडसं पुढे जाणार आहे. अशा करदात्यांनी थोडीशी सावधानता बाळगली तर 12500 पर्यंत कर वाचवू शकता.

ती सावधानता म्हणजे…आयकर कलम 87A नुसार करपात्र उत्पन्न पाच लाखाच्या आत असणारयास कर लागत नाही परंतु पाच लाखाच्या वर 500 रुपये उत्पन्न गेले तर लगेच 12,600+504+1049=14,150/- इतका कर लागू होतो…….कारण त्या करदात्यांस कलम 87Aची सुट लागु होत नाही… 5,00,500/- लाच 14,150 कर लागू होतो तर पूढे जसजसे उत्पन्न पाच लाखांच्या पुढे वाढत जाईल तसतसा कर वाढत जाईल…महणुन सदर कर वाचवायचा असेल तर त्या साठी अशा करदात्यांनी लवकरात लवकर उत्पन्नाची आकडेवारी तपासून पाच लाखाच्या पुढे करपात्र उत्पन्न जात असेल तर 31 जुलै ‘ 2020 च्या आत कलम 80C खाली तेवढ्या जास्त रक्कमे ची गुंतवणूक करावी. किंवा 80D खाली आरोग्य विमा काढून घ्यावा जेणेकरून कर भरावा लागणार नाही…….

अजून एक महीना अवधी आहे, आत्ता लगेच टॅक्स कॅलक्यूलेशन केले तर लक्षात येईल की आपल्याला टॅक्स वाचविण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल . उद्योग,व व्यावसायीक करदात्यां पेक्षा पगारदार करदात्यांचे टॅक्स कॅलक्यूलेशन करने सोपं आहे म्हणून पगारदार वर्गाला तरी ह्या संधीचा लाभ नक्कीच घेता येईल फक्त त्या साठी करदात्यांना थोडसं जागृत राहून त्या प्रमाणे कृती करावी लागणार आहे…पि.के.महाजन…. जेष्ठ कर सल्लागार. पि.चि.पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *